चिखली (हॅलो बुलडाणा / सय्यद साहिल) शहरातील जयस्तंभ चौक, भवानी बिकानेर समोर, किरकोळ वादातून गंभीर घटना घडली. रात्री 10 च्या सुमारास राजू (रावण) आणि बबलू या दोन तरुणांनी अशोक माटे यांच्या पानपट्टीत येऊन एका व्यक्तीचा मोबाईल नंबर मागितला. मांटे यांनी नंबर नसल्याचे सांगताच या दोघांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.मारहाणीत मांटे यांच्या डोक्यावर दारूची बाटली फोडून गंभीर दुखापत केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मांटे यांच्या मुलालाही या युवकांनी बेदम मारहाण केली. या हिंसाचाराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेनंतर चिखली पोलिसांनी तातडीने कारवाई करत राजू (रावण) आणि बबलू यांना ताब्यात घेतले मात्र, या भयंकर घटनेने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.














