spot_img
spot_img

💥भूतदया! ती कॉलमच्या खड्ड्यात पडली अन्….!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील खालिद बिन वलीद नगर मध्ये घराच्या बांधकामासाठी खोदलेल्या कॉलमच्या खड्ड्यात आज एक वगार पडली होती. या वगारीला बांधकाम मजुरांनी सुखरूप बाहेर काढल्यानंतर या वगारने एकच धूम ठोकली.

बुलढाणा शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. नवनवीन वस्त्या तयार होत असून मोठ्या प्रमाणात नवीन घरांचे बांधकाम देखील सुरू आहे. आरटीओ ऑफिसच्या पाठीमागील भागात खालीद बिन वलीद नगर मध्ये मस्जिद जवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या एका कॉलमच्या खड्ड्यात एक वगार आज गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पडली होती. दुपारी 1 वाजेच्या सुमारास बांधकामासाठी ठेकेदार पोहोचला असता ही बाब त्याच्या लक्षात आल्यानंतर अगोदर दोन-तीन लोकांनी वगारला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते यशस्वी झाले नाही, म्हणून त्यांनी जवळ सुरू असलेल्या बांधकामावरील देऊळघाट येथील कामगारांना ही बाब सांगत मदत मागितली असता देऊळघाटचे तरुण धावून आले व सगळ्यांनी मिळून दोरीच्या सहाय्याने खड्ड्यात पडलेल्या वगारला सुखरूप बाहेर काढले.ही वगार खड्ड्याच्या बाहेर येताच तिने एकच धूम ठोकली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!