spot_img
spot_img

💥’दया गडबडही गडबड है!’ स्वच्छतेच्या नावावर पालीका प्रशासनाचा दरोडा! – पैशांवर ‘हात सफाई!’ – तब्बल 22 लाखांचा कंत्राट केवळ 11 लाखांवर चालतोय तरी कसा?

मलकापूर (हॅलो बुलडाणा) नागरिकांना मूलभूत सुविधा देणे नगरपालिकेचे कर्तव्य आहे.परंतु गेल्या 3 वर्षापासून मलकापूर नगरपालिकेत प्रशासकीयांची सत्ता असल्याने ते सत्तांध झाले की काय? असा प्रश्न विविध समस्या उद्भवल्याने उपस्थित झालाय.स्वच्छतेसाठी शासन करोडो रुपये खर्च करते परंतु या खाबूगिरी करणाऱ्या पालिकेचा ढिम्म कारभार सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणारे ठरतेय असा आरोप होतोय. कारण 22 लाखांच्या घनकचऱ्याचे कंत्राट केवळ 11 लाखात घेण्यात आले असून, केवळ पैशांवर ‘हात सफाई’ करण्यात आल्याचेही बोलल्या जातेय.

नगरपालिका ही मुळात राज्य सरकारची काही सार्वजनिक सेवा (म्हणजेच, कचऱ्याची विल्हेवाट, पोलीस आणि अग्निसुरक्षा, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा) या क्षेत्राच्या काउन्टी किंवा इतर स्थानिक सरकारांकडून उपलब्ध असलेल्या गरजेसाठी दिलेला प्रतिसाद आहे.परंतु गेल्या 3 वर्षापासून मलकापूर नगरपालिकेत खाबुगिरी बळवली आहे.नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होत नसल्याचा खुलेआम आरोप होतोय.घनकचरा व्यवस्थापनातील 22 वाहनांपैकी 10 वाहने भंगार झालेत.त्यामुळे घनकचरा उचलण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. ठिकठिकाणी कचरा साचत असल्याने रोगराईंना निमंत्रण मिळतेय.शिवाय पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी बोळवण होतेय. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतल्या जात नाही.सी ओ फोन उचलत नाहीत..त्यामुळे पालिका प्रशासनाचा ढेपाळलेला कारभार पुढे आला असून, याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!