spot_img
spot_img

💥काळीज कप्पा! ‘आठवणींचे पिंपळपान सळसळले!’ – तब्बल 22 वर्षानंतर 44 विद्यार्थिनींची शाळा भरली!

लाखनवाडा (हॅलो बुलडाणा/सहदेव वाकोडे) अनेकांनी मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवलेले आठवणींचे पिंपळपान सळसळले..ते लाखनवाडा येथील स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये! तब्बल 22 वर्षानंतर पुन्हा एकदा माजी विद्यार्थी व शिक्षक यांचे गेट-टुगेदर मोठ्या आनंदात पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी मुख्याध्यापक एस.एम.काळे उपस्थित होते. माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सदरील गेट-टुगेदर कार्यक्रमांमध्ये जुन्या आठवणींना उजाळा देऊन आपले अनुभव कथन करून सध्या कुठे कार्यरत असल्याची माहिती दिली. शाळेने कशा पद्धतीने आम्हाला घडवलं? यावरही चर्चा करण्यात आली.तसेच त्यावेळेस असणारे वर्गशिक्षक विषय शिक्षक यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आणि वर्गामध्ये जाऊन पुन्हा एकदा विद्यार्थी विद्यार्थिनी यांना अध्यापन करून पुन्हा एकदा त्यांनी शाळा भरवली या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माजी विद्यार्थी यांनी सर्व शिक्षक, वसंत गायकवाड, प्रकाश शेरे, सुनील इंगळे, गाडे सर उपस्थिती होते. तसेच सध्या कार्यरत असणारे जिल्हा परिषद हायस्कूल वरिष्ठ लिपिक पंढरी पांढरे,सामाजिक कार्यकर्ते नेहरू युवा केंद्र समन्वयक सुमित वाकोडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमामध्ये शंकर देशमुख, गोपाल चौधरी, सुदीप वाकोडे, हर्षवर्धन वानखडे,शरद तायडे, श्रीधर पांढरे, पांडुरंग होळकर,योगेश बोचरे, रामेश्वर डोंगरे, महेश जाधव व इतर 2003 च्या बॅचचे सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला व गेट-टुगेदर करण्यात आले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!