देऊळघाट (हॅलो बुलडाणा) पायाभूत सुविधा देणे हे ग्रामपंचायतचे कर्तव्य आहे.परंतु ग्रामपंचायतच्या दुर्लक्षाने चांभारवाडा वार्ड नंबर दोन मध्ये नालीची सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरकाव करत असून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरकार आरोग्यवधीत राहण्यासाठी विविध सुविधा पुरवीत असते. परंतु ग्रामपंचायत प्रशासन डोळे झाक करीत असल्याने चांभारवाडा वार्ड नंबर दोन मध्ये सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे.या वार्डमधील नाली ब्लॉक झाली असून,परिसरात सांडपाणी तुंबल्याने दुर्गंधी पसरली आहे.ग्रामपंचायतने याकडे लक्ष पुरवावे,व ही समस्या तात्काळ सोडवावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.