चिखली (हॅलो बुलडाणा) भूखंड लाटून श्रीखंड खाण्याचे प्रकार नवे नाहीत. परंतु भाजपच्या माजी नगरसेविकाने खोटा नकाशा प्राप्त करून भूखंड विकून शासकीय कार्यालयांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे.
फिर्यादी निलेश तेजराव इंगळे स्थापत्य अभियंता नगरपरिषद चिखली यांच्या तक्रारीवरून आरोपी अर्चना सतीश खबुतरे यांच्याविरुद्ध विविध कामांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची हकीकत अशी की, चिखली ते जाफराबाद रोडवर असलेल्या बुद्ध विहार समोरचा सर्वे नंबर 120/2 मधील भूखंड आरोपी अर्चना कबुतरे हीने 27 फेब्रुवारी 2019 ते 25 जून 24 च्या दरम्यान होता नकाशा प्राप्त करून काही लोकांना भूखंड विकला. मौजे चिखली येथे सर्वे नंबर 120 /2 मध्ये 81आर ही 7.50 हेक्टर क्षेत्र मालकीची जमीन असताना अर्चना हिने हेतू पुरस्पर साक्षीदार यांच्या मालकीचे 7.50 हेक्टर आर क्षेत्र स्वतःच्या मालकीचे दाखवून तसा खाजगी स्थापत्य अभियंता यांच्याकडून खोटा नकाशा तयार केला. हा खोटा नकाशा भूमी अभिलेख कार्यालयात खरा असल्याचे भासवून 7.50 हेक्टर आर अधिक क्षेत्र असलेला मोजणी नकाशा भूमी अभिलेख कार्यालयाकडून प्राप्त केला. या नकाशाचा वापर करून नगरपरिषद चिखली कडून विकास परवानगी व तहसील कार्यालय चिखली कडून सनद प्राप्त करून घेतली. त्या आधारे काही लोकांना भूखंड विक्री करून त्याची व विविध शासकीय कार्यालयाची फसवणूक केली, असे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान पोलिसांनी अर्चना खबुतरे विरुद्ध प्लॉट नंबर 484/ 24 कलम 420, 467,468, 471 भांडवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सपोनि निखिल निर्मळ अधिक तपास करीत आहे.