spot_img
spot_img

‘लाल परी’ चा सर्वसामान्यांना झटका! उबाठाने केला चक्का जाम!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) लोक वाहिनी समजल्या जाणाऱ्या ‘लाल परी’च्या भाडेवाढ विरोधात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने चक्काजाम केला आहे.राज्य सरकारने एसटी भाडे वाढ केल्याचे आज मोठे निषेध आंदोलन दिसून आले.

एसटीची भाडेवाढ विधानसभा निवडणुकीपूर्वीच अपेक्षीत होती. तशी चर्चा देखील होती पण निवडणुका पार पडल्यानंतर नवीन सरकार स्थापन झाल्यावर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला. साधारण 2021 पासून एसटी प्रवासी वाहतूक तिकीट दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे प्रदीर्घ काळ प्रलंबित असल्याने ही भाडेवाढ 18% इतकी अपेक्षीत होती. मात्र, त्यामध्ये काहीशी सुधारणा करत 14.95 टक्के इतकी भाडेवाढ करण्यात आल्याचा युक्तीवाद महामंडळाकडून करण्यात येत आहे.दरम्यान विधानसभा निवडणुकीत एसटीचे भाडे कमी करू असे आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडले.दरम्यान पोलिसांनी शिवसैनिकांना स्थानबद्ध केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!