spot_img
spot_img

जयस्तंभ चौकात पोलीसच पोलीस! – 10 अधिकारी आणि 97 कर्मचारी 5 मिनिटात हजर!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) कमीत कमी वेळेत आणि अचूक ठिकाणी मनुष्यबळ पोहोचणे हे पोलीस यंत्रणेचे कर्तव्यच! आणि हाच उद्देश समोर ठेवून जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी आज बुलढाणा येथील जयस्तंभ चौकात ‘क्विक रिस्पॉन्स अलर्ट सिस्टम’ चे प्रात्यक्षिक राबविले अन् येथील जयस्तंभ चौकात 10 अधिकारी आणि 97 कर्मचारी 5 मिनिटात हजर झाले.

दररोज काही ना काही आणि कुठे ना कुठे घटना घडतात.त्यामुळे पोलिसांना अलर्ट राहावे लागते. एखाद्या अचूक ठिकाणी कमीत कमी वेळेत तात्काळ मनुष्य बळ उपलब्ध करून देणे हे पोलीस यंत्रणेचे कर्तव्य आहे. अनुचित घटना घडत असतात. कधी दंगल घडली किंवा कुठे काही जमाव जमला तर आता ‘क्विक रिस्पॉन्स अलर्ट सिस्टम’ मुळे 107 पोलीस पाच मिनिटात हजर होतील,असे एसपी पानसरे यांनी सांगितले.आजही प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.इतरही उपविभागात हे प्रत्यक्ष सादर करण्यात येऊन ही सिस्टीम राबविण्यात येणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!