spot_img
spot_img

💥EXCLUSIVE! जिल्हाधिकरी डॉ. किरण पाटील कारागृहात! – काय आहे प्रकरण?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा नियोजन समिती व शासनाकडून प्राप्त निधीतून बुलढाणा जिल्हा कारागृह येथे विविध विकास कामे सुरु आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील व अपर जिल्हाधिकारी शेलार यांनी कारागृहास भेट दिली.भेटी दरम्यान बंद्याकरीता सुरु करण्यात आलेले नवीन मुलाखत कक्ष, बांधकाम सुरु असलेले व्हि.सी.कक्ष, पाकगृह, दोन प्रार्थना भवन येथे सुरु असलेल्या बांधकामांची पाहणी केली. त्यानंतर सर्कल विभागातील बॅरकची पाहणी करुन बंद्यांशी संवाद साधला.

कारागृहाव्दारे बंद्यांसाठी राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती घेतली. यामध्ये बंद्यांना त्यांचे नातेवाईकांशी संपर्क साधणे, व्हिडीओ कॉलीग सुविधा, ॲलन व्हिडीओ सुविधा, ग्रंथालय, विधीसहाय्य, अल्पमुदतीचे विविध प्रशिक्षण तसेच शेती व वृक्षलागवडी याचा समावेश होता.
जिल्हाधिकारी यांच्या भेटी दरम्यान कारागृहातील बंद्यांनी विविध सांस्कृतीक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कारागृहात राबविण्यात येऊ शकणाऱ्या योजना व कारागृहातील बंदी कारागृहातुन मुक्त झाल्यानंतर त्यांच्या पुर्नवसानसाठी बंद्यांनी व कारागृह प्रशासनाने करावयाची उपाययोजना संदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधुन प्राप्त नवीन रुग्णवाहिकेचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांचेमार्फत पुजन करुन नवीन रुग्णावाहिका कारागृहास प्रदान करण्यात आली. सदर कार्यक्रमा प्रसंगी कारागृह अधीक्षक संदिप भुतेकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी मेघा बाहेकर, तुरुंगाधिकारी मोहन पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शुभम देशमुख तसेच सर्व कारागृह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!