बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्याला पुन्हा सूत्रसंचालका कडून त्या चुकांची पुनरावृत्ती व्हायलाच नको’ या मथळ्याखाली कालच ‘हॅलो बुलडाणा’ने बातमी प्रसारित केली.परंतु जिल्हा यंत्रणेला काहीच फरक पडला नाही.उलट आज तिरंगा डौलाने फडकत असताना, व उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना, पत्रकार तडफडतांना दिसले.अर्थात देशाच्या चौथ्या आधारस्तंभाला धक्काबुक्की करत,पालकमंत्र्यांसमोर पत्रकारांचा अवमान करण्यात आल्याची घटना आज समोर आली.दरम्यान जिल्हा पत्रकार संघासह इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.
पत्रकार समाजाचे चित्र प्रतिबिंबित करतो.तो समाजाचा आरसाच आहे. सत्य समोर आणून अन्याय विरुद्ध झटतो. परंतु हे नेमके आपल्या यंत्रणा समजत नाही.याचे उत्तम उदाहरण आज दिसून आले. ७६ व्यां प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील पत्रकारांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली.हा त्यांचा अवमान आहे. पालक मंत्र्यांसमोर पत्रकारांना जिल्हा पोलिस कवायत मैदानातून बाहेर काढण्यात आले.त्यामुळे संतप्त
जिल्हा पत्रकार संघासह इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाकडून आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. पत्रकारांचा पालक मंत्र्यांनी यात हस्तक्षेप करावा या मागणीसाठी कार्यक्रम सुरू असताना पोलिस कवायत मैदानासमोर पत्रकारांनी ठिय्या देखील मांडला होता.
पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप
घटनेची गंभीरता लक्षात घेत पालकमंत्र्यांनी तात्काळ पत्रकारांशी संवाद साधला. घटनेची गांभीर्याने दखल घेत त्यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
पोलीस अधीक्षकांची दिलगिरी!
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकारांशी संवाद साधत दिलगिरी व्यक्त केली आहे. यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी कठोर पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.