spot_img
spot_img

💥EXCLUSIVE! ‘गोड दिलासा!’ फळगळतीला १६५ कोटीचे ‘धुमारे!’ -बुलढाण्याला ९४५.६५ लाख रुपयांची मदत देण्यास मंजुरी!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ढगाळ वातावरण सततच्या पावसामुळे संत्रा पिकाच्या फळगळतीमुळे झालेल्या नुकसानीस विशेष बाब म्हणून बुलढाणा अमरावती अकोला व
वर्धा जुलै ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत
१६५ कोटी ८३ लाख ८ हजारांची मदत देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी खचला जातो. या बाधित झालेल्या शेतकऱ्याला आधार व दिलासा देण्यासाठी शासन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे मकरंद पाटील यांनी सांगितले. फळ गळतीमुळे झालेल्या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून मदत देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ३ हजार ८५२ शेतकऱ्यांचे २६२६.८० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून ९४५.६५ लाख रुपयांची मदत देण्यास मंजुरी दिली आहे.वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे ऑगस्ट २०२४ कालावधीत ५ हजार ९३३ शेतकऱ्यांचे ३०१३.८५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून १०८४.९८ लाख रुपये मदत देण्यास मंजुरी दिली आहे.जुलै ते ऑगस्ट २०२४ कालावधीत अमरावती जिल्ह्यातील ४१ हजार ९११ शेतकऱ्यांचे ३७३९३.९७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून १३४६१.८३ लाख रुपये, अकोला जिल्ह्यातील ३ हजार ४३३ शेतकऱ्यांचे ३०२९.५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून १०९०.६२ लाख रुपये, विशेष म्हणजे मकरंद पाटील हे बुलढाण्याचे पालकमंत्री झाले आहेत यानंतर त्यांनी पहिलाच या जिल्ह्या बाबतचा निर्णय घेतला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!