सिंदखेड राजा (हॅलो बुलडाणा) भारतात येऊन ब्रिटिशांनी चहा विकला आणि आपल्याला चहाची झिंग चढवून दिली.ही झिंग अद्यापही उतरलेली नाही!चहाची टपरी असो किंवा मग एखादा समारंभ असो, अनेकदा चहा कागदी कपातून पुढे केला जातो. परंतु बुलढाणा जिल्ह्यातील रऊफ भाई यांनी चहा दुकानातून कधीच कागदी कपाचा वापर केला नाही, त्यांनी काचेच्या ग्लासाचा पायंडा कायम ठेवला असून, ते जिल्ह्यातील कागदी कप न वापरणारे पहिले चहा विक्रेते ठरलेत!
चहाच्या दुकानात कागदी कपामध्ये दिलेला चहा हा कागदी कपामध्ये नव्हे तर प्लॅस्टिकचे वेस्टन असलेल्या कागदी कपात देण्यात येतो त्यामुळे घातक प्लास्टिक चहामध्ये विरघळून शरीरात पोहोचते.हे कारण आरोग्य विभागाने पुढे केले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चहाच्या कागदी कपावर बंदी आणली.त्यामुळे कारवाईच्या भीतीपोटी अत्यल्प चहा विक्रेत्यांनी कागदी कप बाजूला करीत काचेच्या ग्लास मध्ये चहा देणे सुरू केले आहे.परंतु गेल्या 38 वर्षाच्या काळात ग्राहकांना कॅन्सर सारखा आजार होऊ नये म्हणून काळजी घेणाऱ्या रऊफ भाईंनी प्रेरक काम केले आहे.त्यांनी आतापर्यंत कागदी किंवा प्लास्टिक ग्लासचा वापर केलेला नाही. त्यामुळे ते जिल्ह्यातील कागदी कप न वापरणारे व चहाचा गोडवा जपणारे भले माणूस ठरले आहेत.














