बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील मुलीचा जन्मदराचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. गर्भलिंग निदान, तपासणी, कन्याभ्रूण हत्या, बालविवाह यासारख्या अनिष्ठ प्रथाना आळा घालण्यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाची व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेस १० वर्षपूर्तीनिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅलीला रवाना केले. यावेळी शाळाचे विद्यार्थी, महिला शिक्षक सहभागी झाल्या होत्या.यावेळी उपस्थितांना बेटी बचाओ बेटी पढाओची शपथ देऊन स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली.