देऊळघाट (हॅलो बुलडाणा) ग्रामपंचायतच्या दुर्लक्षाने अजिंठा रोडवरील जि प मराठी व उर्दू शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरल्याने १२०० पेक्षा अधिक चिमुकल्यासह सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले..ही धोक्याची घंटा कुणालाच ऐकू येत नाहीये..तर कचरा उचलणाऱ्या घंटागाडी नावालाच असून वित्त आयोग निधी केवळ कागदपत्री खर्च होत असल्याचे घाणेरडे चित्र आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट हे मोठ्या लोकवस्तीचे गाव असून या गावात इयत्ता १ ते १२ वी पर्यंत जि.प. ची शाळा व इंग्रजी माध्यमाची सुध्दा एक शाळा याच परिसरात आहे. या तिन्ही शाळेमध्ये जवळपास १२०० पेक्षा अधिक मुले-मुली शिक्षण घेत असून
देऊळघाट व इतर परिसरातील विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात आणि या शाळेच्या परिसरात मुस्लीम धर्मीयांचे प्रार्थना स्थळ मस्जीद सुध्दा आहे. मात्र तिन्ही शाळेच्या मधोमध असलेल्या खुल्या जागेवर देऊळघाट
गावातील काना-कोपऱ्यातील घनकचरा ग्रा.पं.देऊळघाट च्या घंटागाडीमध्ये
सुका व ओला कचरा जमा करुन त्या ठिकाणी सर्रासपणे टाकल्या जातो.
सदरच्या कचऱ्यामुळे शाळेच्या परिसरात दुर्गंधी निर्माण झाली असून शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत संबंधीत ग्राम पंचायत कार्यालयाकडे वारंवार तोंडी माहिती देवून सुध्दा अद्याप पावेतो कोणतीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस त्या ठिकाणी कचऱ्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत असून सर्वदूर पर्यंत घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. एवढेच नव्हे तर त्या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या नागरिकांना सुध्दा या घाणीच्या दूर्गंधीचा सामना करावा लागत आहे. आणि त्याच परिसरात मुस्लीम धर्मीयांचे प्रार्थना स्थळ आहे. दरम्यान घन कचऱ्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावावी अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.