spot_img
spot_img

💥बुलडोझर ब्रेकिंग! “विषय अतिक्रमणाचा!” ‘जनता चौक व इकबाल चौक बुलढाणा मधील नागरिक काय म्हणतात?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) विषय अतिक्रमणाचा आहे. ‘हॅलो बुलढाणा’ नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहे. दरम्यान जनता चौक व इकबाल चौक बुलढाणा मधील नागरिक काय म्हणतात? ते तुम्हीच वाचा..

सकाळपासून जामा मस्जिद समोरील नझुलचे जागेवरील अतिक्रमण उठवण्याची कारवाई कोर्टाच्या आदेशान्वये सुरू आहे असे समजले. या कारवाईचे सर्व जनतेकडून स्वागत आहे. परंतु मागे देखील अशीच कारवाई झाली होती आणि दोन-तीन दिवसानंतर लगेच परत अतिक्रमण धारकाचे नेते अतिक्रमण करतात व आपआपल्या टपऱ्या परत उभ्या करतात.
ईक्बाल चौकामध्ये अलीकडे चहा नाश्तापाणी जेवण पानपट्टी भंगार दुकानदारांनी आपआपली दुकाने थाटली आहेत. या दुकानाचे आडून बरेच बेकायदेशीर धंदे सुद्धा राजरोसपणे सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच चौकामध्ये मुत्री घराची व्यवस्था नसल्यामुळे आजूबाजूच्या घरासमोरच लोक लघुशंकेसाठी बसतात त्यामुळे स्त्रियांना सुद्धा त्रास होतो व बाहेर निघू शकत नाही काही वेळा तर मजीद कॉम्प्लेक्स च्या ओट्यावर झोपणारे बाहेरगावचे भीक मागणारे कुटुंब घरासमोरील नालीमध्ये सकाळी सकाळी संडासला बसतात आणि हटकले असतात भांडण करतात.

जर प्रशासनाला खरोखरीच अतिक्रमण परत बसू द्यायचे नसेल तर खाली झालेल्या जागेवर पार्किंग सुविधा मजीद मध्ये येणाऱ्या लोकांसाठी मसजीद बोर्ड व खाजगी संस्थांच्या सहकार्याने सुरू करावी व नझुलचे सरकारी जागेला तार फेंसिंग करून घ्यावे जेणेकरून धार्मीक प्रार्थना नमाज साठी येणाऱ्या सर्व लोकांच्या रस्त्यावर पार्क होणाऱ्या टू व्हीलर व थ्री, फोर व्हीलर गाड्या सर्व तिथे उभ्या राहतील अशी व्यवस्था करावी. एक वेळ तिथे पार्किंग सुरू झाली तर नमाज साठी येणाऱ्या सर्व लोकांच्या रस्त्यावर पार्क होणाऱ्या गाड्या मसजीद समोरील खाली मैदानावर उभ्या राहतील व वैकुंठ धामकडे जाणारा हुतात्मा गोरे रोड हा रस्ता मोकळा राहील तसेच स्वतः नमाज करिता येणारे धार्मीक लोकच टपरी उभारणार्‍या अतिक्रमणाला विरोध करतील, व भविष्यात नेहमी होणारे वादविवाद टाळता येतील. परंतु विशिष्ट समाजाच्या नेत्यांना ते अतिक्रमण हवेच आहे म्हणून ते अतिक्रमण उठवण्याकरिता विरोध करतात व अतिक्रमण धारकांचे शुभचिंतक असल्याचे भासवतात आणि स्वतःच्याच टपरीज् उभ्या करून भाडेरुपाने हप्ते वसूली करतात.

जर प्रशासनाला यापुढे अतिक्रमण परत बसू नये याची खरोखरीच चिंता असेल तर उपरोक्त फेन्सिंग व पार्किंगचे कार्यक्रमाला प्राधान्य देऊन या पुढील होणारा अतिक्रमणाचा व प्रशासनाचा त्रास टाळावा. ही विनंती!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!