बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘पुष्पा’ सिनेमातील थप्पड पडते राजा हे गाणं गाजू लागले..तसे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील 12 गावांमधील ‘टक्कल पडते राजा’ हे गाणे बेसूर आवाजात गाजत आहे.परंतु गलेलट्ट पगार घेणाऱ्या शासकीय म्हणा किंवा खाजगी संस्था करतात काय?हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील अनेक दिवसापासून शेगाव तालुक्यातील अनेक गावात केसगळती आणि टक्कल पडण्याच्या विचित्र आजाराने हजारो ग्रामस्थ हवालदील झाले आहे. मात्र राज्य आणि केंद्र सरकार सर्वसामान्य ग्रामस्थांना दिलासा देण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी शेगाव येथे बोलताना हा गंभीर आरोप करतानाच राज्य आणि केंद्रातील आरोग्य संस्था या गूढ आजाराचे निदान करण्यात अपयशी ठरल्याने यासाठी जागतिक आरोग्य संस्थेची मदत घ्यावी, त्यांच्या चमुला यासाठी पाचारण करण्याची मागणी केली आहे.
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी हे विधान करून सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले. शेगाव तालुक्यातील केस गळती बाधित बोन्डगाव, कालवड, कठोरा, मच्छिन्द्रखेड, भोनगाव, आदि गावांना भेटी दिल्या. या भेटीत त्यांच्या समवेत ठाकरे गटचे पदाधिकारी उपस्थित होते . यानंतर खेडेकर यांनी शेगाव येथील प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी समवेत संवाद साधला. यावेळी त्यांनी आपला संताप व्यकत करताना राज्य सरकार, केंद्र सरकार, आरोग्य यंत्रणाणा धारेवर धरले.राष्ट्रीय स्तरावरील
आरोग्य यंत्रना, राज्याचा आरोगय विभाग यांना शेगाव तालुक्यातील केस गळती आणि टक्कल पडण्याचे कारण शोधता येत नसेल तर ‘डब्ल्यू एच ओ’ च्या टीमला पाचारण करा, अशी रोखठोक मागणीच खेडेकर यांनी केली.केस गळती प्रकरणावरून उबाठा शिवसेनेचा संताप व्यकत करताना खेडेकर म्हणाले कि, मागील अनेक दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात केस गळतीने दहशत निर्माण केली आहे. केस गळती आजाराची रुग्णसंख्या दोनशेच्या पर गेली आहे. शेगाव पाठोपाठ नांदुरा तालुक्यातील वाडी गावात देखील सात रुग्ण आढळून आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यात गेल्या वीस दिवसापासून केस गळतीचे दहशतीने अनेकांना चिंताग्रस्त करून सोडले आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणेपासून राष्ट्रीय पातळीवरच्या आरोग्य संस्था केस गळतीचे कारण शोधण्यासाठी बाधित गावात येऊन गेल्या आहेत. अनेक तज्ज्ञ तळ ठोकून मुक्कामी राहिले. आयसीएमआर दिल्ली, चेन्नई सारख्या संस्थेचे तज्ज्ञ येऊन गेले.
मात्र अजूनही केस गळतीचे नेमके कारण शोधण्यात या आरोग्य संस्थांना यश आलेले नाही. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय पातळीवरच्या संस्थांना देखील केस गळतीचे नेमके कारण सापडत नसेल तर आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)ला या प्रकरणात पाचारण करण्याची मागणी यावेळी उबाठा शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी केली.
▪️बाधित गावांतील सध्याचे चित्र काय?विविध आरोग्य यंत्रणा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पथक, राष्ट्रीय स्तरावरील नामांकित आरोग्य संशोधन संस्था यांच्या मुक्कामी भेटीचा धडाका , नमुने संकलन अन सर्वेक्षणाचा महापूर असे आठवड्यापासूनचे चित्र आहे. या अनामिक आजाराचे आठवड्यानंतरही अचूक निदान आणि उपचार न सापडल्याने बारा गावातील हजारो गावकरी हवालदिल आणि भयभीत झाले आहेत. अनामिक दहशतीत ते राहत आहे
▪️किती गावांत प्रादुर्भाव झालाय…?
नांदुरा तालुक्यातील वाडी या १९४२ लोकसंख्या असलेल्या गावाचा समावेश आहे . येथील सात रुग्ण तीन परिवारातील आणि ३ ते ४५ या वयोगटातील आहेत. शेगाव तालुक्यातील बोन्डगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, मच्छीन्द्रखेड, हिंगणा, घुई, तरोडा खुर्द, पहुरजीरा, माटरगाव, आणि निंबी ही गावे बाधित आहेत . बारा गावांतील २४ हजार २८४ ग्रामस्थ भीतीने गारठले आहे.
▪️यंत्रणा अपयशी ठरल्या का?
दुर्देवाने याचे उत्तर हो असेच आहे, असे म्हणता येईल.पट्टीचे आरोग्य विषयक शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ वैद्यकीय तज्ञ या आजारापुढे हतबल ठरले . केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या गृह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा किती तोकडी आणि जागतिक महासत्ता बनण्याचे दिवास्वप्न पाहणाऱ्या भारत देशातील सर्वोच्च आरोग्य संशोधन संस्थाच्या मर्यादा उघड्या पडल्या. अब्जावधींचे बजेट असणाऱ्या या संस्थाचे हे घोर अपयश तूर्तास तरी अधोरेखित झाले आहे.
▪️भेटी देणाऱ्या संस्था कोणत्या?
शेगाव तालुक्यात ‘वायसीएमआर’ दिल्ली, चेन्नई, भोपाळ येथील शास्त्रज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ येऊन गेले. अलोपॅथी, होमीओपॅथी, युनानी आणि आयुष् (आयुर्वेद) या चार प्रमुख वैद्यक शाखांचे तज्ञ येऊन गेले. नागपूर येथील पथकाने भेट दिली. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय} ची पथके आलीत, जिल्हा आरोग्य यंत्रणा २४ बाय सात सेवेत दक्ष आहेत.
▪️रुग्णसंख्या किती अन् नमुने संकलन विषयी?
१४ जानेवारी अखेर शेगाव तालुक्यात १७१ ते नांदुरा तालुक्यात ७ मिळून १७८ रुग्ण निष्पन्न झाले.या गावातील जल, रक्त, नख केस, यांचे नमुने वेगवेगळ्या प्रयोगशाळा मध्ये पाठविण्यात आले आहे. स्किन बायोप्सी देखील पाठविण्यात आले आहे. तसेच पाण्यातील लीड, आर्सेलीन, कॅडीमिनियंम
सारख्या ‘हेवी मेटल्स’ ची नाशिकच्या खाजगी प्रयोगशाळा मध्ये तपासणी करण्यात येणार आहे.














