बुलढाणा (हॅलो बुलडाणा)अपघाताच्या घटना व तांत्रिक बिघाड टळून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी स्कूलबसला ‘फिटनेस सर्टिफिकेट’ म्हणजे योग्यता प्रमाणपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु बुलढाणा शहर ग्रामीणमधील स्कूल बस व व्हॅनची तब्बल 603 संख्या आहे.पैकी 222 स्कूल बस -व्हॅनची तपासणी करण्यात आली. यामध्ये अनेक वाहनांना फिटनेस सर्टिफिकेटच नसल्याचे पुढे आले आहे.अशा वाहनांमधून विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न आहे. शिवाय आरटीओ धडक मोहीम किंवा राबविणार ?असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत.
विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला
संवेदनशील वाहतूक म्हणून नोंद करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी विशिष्ट नियमावली आहे.यात स्कूल बस व स्कूलव्हॅनच्या रंगापासून ते आसन क्षमता व वेगावरील मर्यादाही आखून दिली आहे. न्यायालयाचा आदेश व परिवहन विभागाच्या निर्देशानुसार शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहचालकांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत (आरटीओ)आपल्या स्कूल बस किंवा स्कूलव्हॅनची दरवर्षी योग्यता तपासणी करणे बंधनकारक आहे. परंतु काही चालक याकडे दुर्लक्ष करीतअसल्याचे दिसून येते. दरम्यान स्कूल बस व व्हॅन चालकांनी योग्यता प्रमाणपत्र व इतर तीन कागदपत्र तपासून नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरटीओ विभागाकडून करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी 48 स्कूल वाहनांवर कारवाई
आरटीओ विभागाकडून गेल्या वर्षी 48 स्कूल वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये तीन लाख 23 हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.