बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला. मात्र, पालकमंत्री पदासंदर्भात निर्णय झाला नव्हता. अखेर आज (१८ जानेवारी) पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पद मकरंद जाधव पाटील यांना देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलं आहे.ना. मकरंद लक्ष्मणराव जाधव (पाटील) हे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत. त्यांचा मतदारसंघ २५६-वाई,जिल्हा – सातारा आहे. त्यांनी संत तुकडोजी ग्राम स्वच्छता स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस मिळवून दिले होते.त्यांनी विविध पायाभूत सुविधांची कामे केलीत.














