चिखली (हॅलो बुलडाणा / सय्यद साहिल) नवीन वर्षात अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहेत. आता थोड्यापूर्वी झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. अविनाश ज्ञानदेव सपकाळ रा.सिंधी हराळी असे त्याचे नाव आहे.
चिखली तालुक्यातील खामगाव जालना रोड मार्गावरील रेणुका पेट्रोल पंप जवळ हा अपघात आता थोड्यापूर्वी झाला.मृतक हिरो ड्युट स्कुटी घेऊन रस्त्यावर येत असताना दुचाकीचा ब्रेक मारल्याने गाडी स्लीप झाली आणि ट्रकने त्याला चिरडले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.