बुलढाणा (हॅलो बुलडाणा) वरिष्ठांच्या आदेशाला धूडकावून कोट्यावधींच्या साहित्य खरेदी घोटाळा प्रकरणात जिल्हा सामान्य रुग्णालयातील भंडारपाल प्रकाश नामदेव बोथे याने अनियमितता केल्याने त्याला बडतर्फ करण्यात आले आहे. ‘हॅलो बुलढाणा’ने या भ्रष्टाचारी विरोधात सत्याच्या मार्गाने वृत्तमालिका चालविली होती हे विशेष!
जिल्हा सामान्य रुग्णालयातील साहित्य खरेदी घोटाळा सर्वश्रुत आहे.यातील एक दोषी भंडारपाल प्रकाश नामदेव बोथे पैशांच्या बळावर व राजकीय यांच्या आश्रयाने आतापर्यंत मोकळा होता. परंतु ‘हॅलो बुलढाणा’च्या माध्यमातून दोषींविरुद्ध वृत्त मालिका चालविण्यात आली.त्याचा परिणाम मात्र आता दिसून येत आहे.
प्रकाश एन. बोथे, कनिष्ठ लिपीक (निलंबीत) सामान्य रुग्णालय, बुलडाणा येथे कनिष्ठ लिपीक पदावर 24 जानेवारी 19 पासून कार्यरत होता. या आरोपीने वरिष्ठांचे आदेश न मानता गैरव्यवहार केले.करोडो रुपयांचे साहित्य कागदोपत्री सही करून लुबाडणूक केली.यामध्ये अनेक डॉक्टरांचा हात आहे.मात्र चौकशी सुरू असून सदर आरोपी ही जेरबंद लवकरच होणार आहेत.आज प्रकाश बोथेवर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ चे उल्लघंन प्रकरणी गुंन्हा दाखल करत सेवेतून बडतर्फ केले आहे.
क्रमशः














