बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अंमली पदार्थ विक्रीमुळे जिल्ह्याला गुन्हेगारी स्वरूप प्राप्त होत चालले आहे.सहज उपलब्ध होत असलेल्या गांजामुळे तरुणाई नशेत झिंगत आहे. बिबी पोलीस ठाणे हद्दीत तिघांकडून 10.300 किलो ग्रॅम गांजासह दुचाकी मोबाईल असा एकूण 2,14,500 रुपयांचा मुद्देमाल जप्तीची कारवाई देऊळगाव कोळ शिवारात एलसीबीने 16 जानेवारीला केली.
शेख इस्माईल शेख मोहम्मद सुलतानपूर तालुका लोणार,जावेद खान हमीद खान खामगाव, शेहबाज खान हमीद खान, खामगाव अशी आरोपींची नाव आहेत.अंमली पदार्थ विक्री जिल्ह्यात वाढत असून, गांजा तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांची पाळेमुळे खणून काढण्याची गरज निर्माण झाली आहे.बुलढाणा शहरासह जिल्ह्यातील तरुणांना नशेची लत लावून गैर मार्गाला लावले जात आहे. कल्चरच्या नावाखाली गांजा सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे.परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात बुलढाणा शहरात म्हणा की जिल्ह्यात गांजा येतो कुठून? त्याचा तपास करण्याचे आव्हान पोलीस यंत्रणे पुढे आहे.टीप दिली म्हणून कारवाई होते.आज 16 जानेवारीला
बिबी पोलीस ठाणे हद्दीत तिघांकडून 10.300 किलो ग्रॅम गांजासह दुचाकी मोबाईल असा एकूण 2,14,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.














