spot_img
spot_img

💥BREAKING! थरारक अपघात! आयशर व दुचाकी होंडा शाईनचा अपघात एक जागीच ठार! एकाचा हात खांद्यापासून वेगळा!

चिखली (हॅलो बुलडाणा / सय्यद साहिल) बुलडाण्याकडून चिखलीकडे जात असतांना पहिल्याच वळणावर ब्रेकर च्या समोर असलेला चिखली शहरातील माऊली पेट्रोल पंपाजवळ आयशर गाडीला होंडा शाईन मोटरसायकलने धडक दिल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.गणेश प्रल्हाद पवार राहणार सातगाव भुसारी असे मृतकाचे नाव आहे.तर सचिन दिनकर गायकवाड सातगाव भुसारी हा जखमी झाला आहे.

गणेश प्रल्हाद पवार व सचिन दिनकर गायकवाड हे दिवठाणा येथून होंडा शाइन दुचाकी वर सातगाव भुसारी येथे घरी जात असतांना,माऊली पेट्रोल पंपा जवळ आयशर गाडीला जोरदार धडक दिली.झालेल्या अपघातात गणेश प्रल्हाद पवार याचा खांद्यापासून हातच वेगळा झाला व तो जागीच गतप्राण झाला तर, सचिन गायकवाड याच्या छातीत, हातापायाला जबर मार लागल्याने तो गंभीर असून त्याला उपचाराकरिता त्वरित हलविण्यात आल्याची माहिती मिळालीआहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!