बुलढाणा (हॅलो बुलडाणा) झटपट श्रीमंत होण्याच्या नादात कोण काय करेल? याचा नेम नाही.पोलीस स्टेशन धाड हद्दित म्हसला शिवारात 8 जानेवारीला भारतीय चलनातील नोटा,मारुती ईरटिका,मोबाईल असा एकूण 16,94,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व पो.स्टे. धाड यांनी संयुक्तपणे केली आहे.मंगेश दादासाहेब वाळे वय 51 वर्ष रा. सिंहगड रोड पुणे,
मोहन वालीया मुडावत वय 40 रा. पुणे अशी आरोपींची नावे आहेत.त्यांच्याकडून 8,83,000 रुपयांच्या 500 रुपयांच्या व 200 रुपये मुल्याच्या बनावट भारतीय चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
8 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, पो स्टे
धाड हददीत काही इसम हे त्यांचे ताब्यातील वाहनामध्ये बनावट भारतीय चलनी नोटा घेवुन येत आहे.त्यावरुन स्थानिक गुन्हे
शाखेचे पथक धाड येथे जावुन ठाणेदार यांना सदर माहिती दिली.धाडचे पोलीस अधिकारी
व पो स्टाफ सह धाड ते छ. संभाजीनगर रोडवर म्हसला खु. शिवारामध्ये गितांजली फॅमिली गार्डन ॲन्ड रेस्टॉरंट चे समोर रोडवर नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान मिळालेल्या खबरेनुसार एक सिलव्हर रंगाची इरटीगा गाडी क्रमांक MH-12-VV -0130 ला पोलीसांनी थांबविली व सदर गाडीची शासकीय पंच व अपर कोषागार अधिकारी यांचे समक्ष झडती घेतली असता सदर गाडीमध्ये पृष्टाचे बॉक्स मध्ये 500 रुपयाच्या 1670 नोटा व 200 रुपयाच्या 240 बनावट भारतीय चलनी नोटा एकुण 8,83,000 रुपयांच्या नोटा मिळुन आल्या आहेत. सदर नोटा बाबत अपर कोषागार अधिकारी व स्टेट बँक धाड येथील अधिकारी यांनी सदर नोटा चेक करुन त्या चलनी बनावट असल्या बाबत अभिप्राय दिला आहे.
▪️यांनी केली कामगिरी!
सदरची कार्यवाही श्री. विश्व पानसरे- पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्री. अशोक थोरात अपोअ. खामगांव, श्री बी.बी महामुनी- अ.पो.अ.- बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. श्री. अशोक एन. लांडे, स्था.गु.शा, बुलढाणा यांचे आदेशाने सपोनि.
आशिष चेचरे, पो.स्टे. धाड, सपोनि यशोदा कनसे, पोहेकॉ राजेश टेकाळे, अनुप मेहर, पो.ना विजय वारुळे, विजय पैठणे, पोकॉ मंगेश
सनगाळे, मनोज खरडे, दिपक वायाळ, ऋषीकेश थुटटे, चालक पोहेकॉ समाधान टेकाळे स्थागुशा बुलढाणा तसेच पोहेकॉ. राजू
आडवे, पोकॉ. ऋषीकेश खंडेराव- तांत्रीक विष्लेषण विभाग बुलढाणा व पोहकॉ रविंद्र बऱ्हाटे, पोना राजु माळी, श्रीकृष्ण चव्हाण,
ईश्वर हावरे, पोकॉ माळोदे सर्व पो.स्टे. धाड यांनी केली.