बुलडाणा (हॅलो बुलडाणा) वीज चोरी विरोधात अकोला परिमंडळात जोरदार मोहिम उघडण्यात आली असून या मोहिमेत महावितरणकडून विभागानुसार ३० ते ४० पथके तयार करण्यात आली आहेत.आगामी तीन महिने सतत चालणाऱ्या या मोहिमत महावितरणकडून थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अभियंता यांनी दिली आहे.
कार्यकारी संचालक(प्रकल्प)धनंजय औंढेकर यांनी नुकताच व्हिडीवो कॉन्फरंन्सच्या माध्यमातून घेतलेल्या आढावा बैठकित वीज गळती व वीज हानी विरूध्द नाराजी व्यक्त करत वितरण हानी १५%पर्यंत कमी करण्याचे उध्दीष्ट दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात परिमंडळाअंतर्गत अकोला,बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात महावितरण अकोला परिमंडळात वीज चोरीविरोधात मोहिम तीव्र करण्यात आली आहे. या मोहिेमत, फॉल्टीमीटर,सरासरी वीज बिल,शुन्य युनिटचे बिल,अत्यल्प वीज वापर अश्या सर्वच ग्राहकांची तपासणी करण्याला सुरूवात करण्यात आली आहे.