बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत ४ गावासह जवळा बुद्रुक अंतर्गत २ अशा ६ गावांमध्ये एकुण ५१ ‘टक्कल बाधित’ रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे यांनी ‘हॅलो बुलढाणाला’ दिली.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील ६ गावात ग्रामस्थांच्या केसाची जलद गतीने गळती होऊन टक्कल पडल्याचा प्रकार समोर आलाय. यामुळे गावकरी धास्तावले असून आरोग्य यंत्रणा चक्रावली आहे.
आरोग्य विभागाची पथके बाधित गावांमध्ये तळ ठोकून आहे. जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे हे शेगाव तालुक्यात तळ ठोकून आहे. शेगाव तालुक्यातील ‘बाधित’ गावात युद्ध पातळीवर सर्वेक्षण करण्यात आले.दरम्यान पाण्याचे नमुने जैविक व रासायनिक तपासणीसाठी काल पाठविण्यात आले असून आज रिपोर्ट प्राप्त होईल. ७ रुग्णांना Skin biopsy testing साठी अकोला शासकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले आहे.या प्रकाराकडे
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते लक्ष ठेवून आहे.
▪️कोणत्या गावात किती रुग्ण?
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील
प्रा.आ. केंद्र भोनगाव अंतर्गत ४ गावात
बोंडगाव – १६
कालवड- १३
कठोरा- ०७
भोनगाव – ०३
प्रा. आ. केंद्र जवळा बु. अंतर्गत २ गावात
१) हिंगणा वैजिनाथ- ६
२) घुई- ७
असे एकुण ५१ रूग्ण आढळून आले आहे.














