देउळगाव मही (हॅलो बुलडाणा) जिल्हाधिकारी यांनी वाळू माफिया पुष्पावर कारवाई करण्याचे हेडिंग वृत्तपत्रांतून छापून घेतले असले तरी,हे पुष्पा वठणीवर आलेले नाहीत.7 जानेवारीला रात्री 10 वाजता देऊळगाव मही येथे एका तलाठ्याला अवैध वाळू वाहणाऱ्या सूसाट टिप्परने उडविल्याने तलाठी गंभीर जखमी झाला आहे.परमेश्वर बुरकुल असे जखमी तलाठ्याचे नाव आहे.
तलाठी परमेश्वर बुरकुल हे दुचाकीने देउळगावराजा कडे येत होते. दरम्यान, देउळगाव मही गावाजवळ त्यांना अज्ञात टिप्परने जबर धडक दिली. त्यामध्ये ते गंभीर
जखमी झाले. त्यांना तातडीने दे मही ग्रामीण
रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच देउळगावराजा पोलिसांनी टिप्परचा शोध सुरू केला होता. या घटनेमुळे वाळू माफीयांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हा यंत्रणेने युद्ध पातळीवर ॲक्शन मोडवर येण्याची गरज निर्माण झाली आहे.