spot_img
spot_img

💥💥💥 EXCLUSIVE – वाळू तस्कर ‘पुष्पा’ ‘हॅलो बुलडाणा’ च्या बातमीने दणाणले! जळगाव जामोद तालुक्यात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई !

जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) जळगाव जामोद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या रेतीमाफीयांनी हैदोस घातला होता.दरम्यान ‘हॅलो बुलढाणा’ ने बातमी प्रकाशित करताच कारवाईला सुरुवात झाली.

विनापरवाना पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा चालू होता. रेती चोरीचा नवीन प्रकार केणी मशीनद्वारे पाण्यातून रेती सर्रास काढल्या जात होती. यासंबंधी अनेक वेळा बातम्या ठोकुन महसूल विभागाच्या ढिसाळ कारभाराचा पंचनामा केला होता. तसेच दोन दिवसा अगोदर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना चे जळगाव जामोद तालुकाप्रमुख गजानन वाघ यांनी सुद्धा मोठ्या आंदोलनाचा इशाराच दिला होता. त्यावर तहसीलदार पवन पाटील यांनी पूर्णा नदी पात्रातील अवैध रेती उपसा याबाबत कारवाई करण्यास सुरुवात केली. या मोहिमेसाठी त्यांनी कोणतेही गावातून जाणे टाळले व दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी तहसीलदार पवन पाटील व तारासिंग पवार यांचे सह एनडीआरएफ पथक जिल्हाधिकारी तसेच अप्पर जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांचे मार्गदर्शनात पथक तयार करून तहसीलदार पवन पाटील नायब तहसीलदार भरत किटे, भारसाकडे, मंडल अधिकारी सातपुते यासह सर्व तलाठी कोतवाल यांच्या पथकाने पूर्ण नदीत बोटीसह उतरून मौजे गोळेगाव हुरसाड या भागात धडक कारवाई केली. या कारवाई दरम्यान तहसीलदार यांचे पथक पाहून रेती माफियांनी पूर्णा नदी पात्रातून आपल्या वाहनासह पोबारा केला. यावेळी तहसीलदार पवन पाटील यांच्या पथकाने घटनास्थळावरून नदीपात्रातील पाण्यातुन रेती काढण्याचा सक्शन पंप, दोन ट्रॅक्टर आणि तीन केणी मशीन जप्त करण्यात आले आहेत. पुढील कारवाईसाठी जप्त केलेला मुद्देमाल तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आला आहे. सदरची कारवाई दरम्यान पोलीस स्टेशनचे पीएसआय अमोल पंडित, पीएसआय नागेश खाडे, पीएसआय नारायण सरकटे यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत संबंधित रेती माफियांवर गुंन्हा दाखल करण्यात आला नव्हता.. तहसीलदार पवन पाटील यांनी केलेले या कारवाईमुळे तालुक्यामध्ये अवैधरीत्या रेती तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे. जळगाव जामोद महसूल प्रशासनाने आतापर्यंत ही अशी एकही मोठी कारवाई केली नव्हती हे विशेष.. यावेळी तहसीलदार पवन पाटील यांनी ‘हॅलो बुलडाणा’शी बोलताना सांगितले की मागील महिन्यात येते संदर्भात अनेक कारवाया करण्यात आल्या त्यामध्ये दहा वाहनांवर कारवाई करून जवळपास ७०० ब्रॉस रेती जप्त करण्यात आली. अशाच प्रकारे रेती माफियांवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!