spot_img
spot_img

💥💥💥EXCLUSIVE – शिवारात आढळले कोरियन भाषेत लिहिलेले यंत्र: काय आहे सत्य? मेहकरजवळील शिवारात खळबळ – शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण!

मेहकर (हॅलो बुलडाणा) नजिकच्या चायगाव शिवारात 4 जानेवारीला संध्याकाळी आकाशातून एक कोरियन यंत्र पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. श्रीकांत बदामे यांच्या शेतात हे यंत्र फुग्यासोबत खाली आले. शेतात असलेल्या श्रीकांत व त्यांचा मुलगा महेश बदामे यांनी यंत्र पडताना पाहिले. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या यंत्रावर कोरियन भाषेत मजकूर लिहिलेला होता. महेश बदामे यांनी गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने तो मजकूर वाचला असता, हे यंत्र कोरियन सरकारच्या हवामान खात्याशी संबंधित असल्याचे समोर आले. मजकूरानुसार, हे यंत्र जर कुठे सापडले, तर ते कचऱ्यासारखे फेकून द्यावे, असा संदेश देण्यात आला आहे. तथापि, यंत्र खरोखरच कोरियन हवामान खात्याचे आहे का, याबाबत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

यापूर्वी, चिखली तालुक्यातही अशाच प्रकारचे यंत्र सापडले होते, त्यामुळे ही घटना पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. महेश बदामे यांनी पोलिस आणि महसूल विभागाला याची माहिती दिली असून, घटनास्थळाची पाहणी झाली आहे. या घटनेमुळे कोरियन यंत्रांचा उद्देश आणि त्यांचा संबंध नेमका काय आहे, याबाबत स्थानिक नागरिकांत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या.

परिसरातील लोकांना योग्य माहिती आणि या घटनेमागील सत्य उघडकीस आणण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलण्याची गरज आहे. अशा रहस्यमय घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट अधिक गडद होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!