बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भर पावसाळ्यात हिवरा नाईक या गावाला पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहे. या आदिवासी बहुल गावात असलेली विहीर सुद्धा बुजविल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने महिलांनी अखेर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील काही भागाला पाणीटंचाईचा अभिशाप आहे. उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणीटंचाई असते परंतु चिखली तालुक्यातील हिवरा नाईक हे गाव सध्याही तहानलेले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात सुद्धा महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी उपोषण केले होते. परंतु संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष दिले नाही. या गावांमध्ये विहीर बांधण्यात आली होती. ही विहीर सुद्धा ग्रामसेवक यांनी बुजविल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिणामी महिला व तरुणींना डोंगरात पाण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे. वीर बुजविणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी व जिल्हाधिकारी यांनी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.