बुलढाणा (हॅलो बुलडाणा) क्रीडा क्षेत्रात बुलढाणा काही कमी नाही.राष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्यासाठी खेळाडूंना येथे वाव आहे. नुकतीच’राष्ट्रीय टग ऑफ वार’ स्पर्धेसाठी बुलढाणा जिल्हा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
‘टग ऑफ वार’ फेडरेशन ऑफ इंडिया न्यू दिल्ली यांच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र टग ऑफ वार असोसिएशन यांच्या वतीने 2 ते 4 जानेवारी 2025 दरम्यान चिंचणी बीच समुद्रकिनारा बोईसर जिल्हा पालघर येथे 36 वी राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धा
आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र संघाची राज्य स्पर्धा व निवड चाचणी 14 ते 16 डिसेंबर 2024 रोजी चिंचणी बीच बोईसर पालघर येथे पार पडली. या राज्यस्तरीय स्पर्धेतून बुलढाणा जिल्हा संघाने 440 किलोग्रॅम वजन गटांमध्ये कास्यपदक पटकावले.बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडूंनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून त्यांची बुलढाणा जिल्ह्याचे आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त श्रीराम निळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. महाराष्ट्र संघात शिवराज श्रीराम निळे यांच्या नेतृत्वात 440 kg.वयोगट 17 वर्ष मिक्स गटांमध्ये शिवराज श्रीराम निळे, आर्यन मनोज नाफडे, सोहम अशोक वारकरी, अदैवत अरविंद देशमुख, प्रथमेश अतुल उंबरकर, कु. मुद्रा मोहन वानखेडे, कू. मानसी दिनेश बकाले, कु.रिया दिगंबर कपाटे, कु.शरयू अशोक वारकरी, अनुश्री संदीप पाटील, यांची निवड करण्यात आली.