8.2 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

विधानसभेत नेत्यांना येणार शेतकऱ्यांचा कळवळा!-ना. शिंदे यांचे ते मिशन फेल,-जिल्ह्यात 19 शेतकरी आत्महत्या

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा गाजला होता.या अपयशाची जबाबदारी
एकमेकांवर ढकलण्याचे प्रकार नेत्यांकडून होत आहेत.आता विधानसभेचे वेध लागल्याने इच्छुक उमेदवार केवळ शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासित करीत असल्याचे दिसते. गंभीर बाब म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात 2 महिन्यात 19 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

बुलढाणा जिल्हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून सध्या ओळखला जात आहे. जिल्ह्यात मे महिन्यात नापिकी व कर्जबाजारीपणा आदी काराणामुळे 17 तर जून महिन्यात 2 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. यात शासकीय मदतीसाठी कोण पात्र ठरेल व कोण अपात्र हा आकडा सध्या येणे बाकी आहे. राजकीय नेत्यांचे शेतकऱ्यांकडेच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. वाढता खर्च व शेतमालाचे पडलेले दर यामुळे शेतकरी तोट्यात जात आहे. राजकीय नेत्यांच्या शेतकरी आत्महत्यांबाबतच्या संवेदना संपल्याने रोज “मरे त्याला कोण रडे’ अशी स्थिती निर्माण झाली असल्याचे बोलल्या जात आहे. आता विधानसभा निवडणूक असल्याने राजकीय नेते पुन्हा शेतकऱ्यांचा कळवळा आणून मतांचा जोगवा मागणार आहेत.
………..
मुख्यमंत्र्यांचे मिशनही फेल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये पदभार स्वीकारताच ‘महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त’ करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना अंमलात आणल्याचा दावाही केला. पण शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र काही थांबलेले नाही, असा ही आरोप होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!