spot_img
spot_img

खळबळजनक आरोप! केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी मतदारांना पैसे वाटले! -प्रा.नरेंद्र खेडेकर यांचे वक्तव्य! – डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा दुजोरा!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) विधानसभाच्या निवडणूक संपल्यात.मंत्रीपदं वाटण्यात आली. परंतु जिव्हारी लागलेल्या पराभवातून अजूनही काही उमेदवारांची सुटका झाली नसल्याचे दिसते. त्यांचे सहकारी पक्षाचे पदाधिकारी देखील आगपाखड करताना दिसून येताहेत. डॉ. राजेंद्र शिंगणे का पराभूत झाले तर.. शिंदे सेनेचे खासदार तथा केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनीच सिंदखेड राजा आणि शेंदुर्जन परिसरात मतदारांना पैसे वाटत असल्याचा खळबळजनक आरोप प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी केला. ते अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलत होते.यावेळी मंचावर डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.या संदर्भातील व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात मनोज कायंदे, डॉ. शशिकांत खेडेकर,डॉ.राजेंद्र शिंगणे, गायत्री शिंगणे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढविण्यात आली होती.डॉ.शिंगणे यांनी आधी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून अजित दादा पवार गटात प्रवेश घेतला होता.दरम्यान अजितदादांच्या आशीर्वादाने त्यांना जिल्हा बँकेसाठी तीनशे कोटी रुपये मिळाले होते.परंतु निवडणुकीच्या ऐनवेळी डॉ.शिंगणे यांनी पुन्हा शरद पवार गटात घरवापसी केली.दरम्यान विधानसभा निवडणुकीत डॉ. शिंगणे यांचा पराभव झाला आणि तेथे मनोज कायंदे हे जायंट किलर ठरले. दरम्यान हा पराभव जिव्हारी लागला की काय? महावि उबाठा गटाचे प्रा. नरेंद्र खेडकर यांनी एका अभिष्टचिंतन सोहळ्यात केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी सिंदखेड राजा व शेंदुर्जन परिसरात पैसे वाटल्याचा थेट आरोप केला आहे.या आरोपाला स्वतः डॉ राजेंद्र शिंगणे यांनी जाहीरपणे दुजोरा दिला आहे.यावर आता ना. प्रतापराव जाधव काय प्रतिक्रिया व्यक्त करतील याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

▪️आणखी काय म्हणाले प्रा.खेडकर?
केंद्रीय आयुष मंत्री पैसे वाटत असेल तर हा देश कुठे चालला? कुणाला बेरोजगाराची चिंता नाही. शेतकऱ्यांची देखील काळजी नाही.त्यामुळे चिंतन करण्याची गरज आहे,असेही प्रा. खेडकर म्हणाले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!