बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आज ख्रिसमस डे! जिंगल बेल, जिंगल बेलची मना मनात धून! गुलाबी थंडीचा आनंद द्विगुणीत करायला ख्रिसमस सण आज आलाय. सांताक्लोज लहान मुलांना गिफ्ट आणि मोठ्यांना शुभेच्छा देऊन जातो. पण, लहानपणापासून सांताक्लॉज लाल रंगाचेच कपडे का घालतो हे कोडे प्रत्येकाला पडलेले असते. सांताक्लॉज लालच रंगाचे कपडे परिधान का करीत असावा? तर वाचा..
लाल रंगातील उबदार सूट घातलेला पाठीवर भलीमोठी थैली घेतलेला, ज्याचे पोट मोठे आहे. ज्याचे लांब केस, दाढी पांढरी आहे. पाठीवर भेटवस्तूंची थैली घेऊन मुलांना भेटवस्तू द्यायला येणारा सांता आपण नेहमीच पाहत आलो आहोत. दरवर्षी येणारा ख्रिसमस वेगळी उर्जा देऊन जातो.दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जातो. दरवर्षी प्रभु येशूच्या वाढदिवसानिमित्त सांताक्लॉज गिफ्ट आनंदाचे वाटप करतात. मुलांना भेटवस्तू देतात. प्रत्येकजण नवीन कपडे घालून हा दिवस साजरा करतो.एका मान्यतेनुसार, ख्रिसमसच्या दिवशी लाल रंगाच्या कपड्यांबाबत अनेक गोष्टी आहेत. असे म्हटले जाते की लाल रंग हा आनंद आणि प्रेम आणि उत्साहाचा रंग आहे. लाल रंग हा येशू ख्रिस्ताच्या रक्ताचेही प्रतीक मानला जातो. जे येशूद्वारे इतरांवरील अपार प्रेम दर्शवते. प्रभु येशूने प्रत्येक ख्रिश्चनांना आपले आपत्य मानले आहे आणि त्यांच्यावर खूप प्रेम केले. त्यांचा सांभाळ केला. यामुळेच लाल रंगातून सर्वांच्या मनात आपुलकीचा धडा निर्माण करायचा होता. लाल हा आनंदाचा रंग आहे, त्यामूळे जिथे लाल रंग असेल प्रेम असेल तिथे आनंद येतो.