बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘नजर हटी दुर्घटना घटी’ या म्हणी प्रमाणे वाहन चालविताना दक्ष राहायला हवे! परंतु दिवसागणिक अपघातांचे प्रमाण वाढत आहे.यंत्रणा मात्र उपायोजना करण्यात कुठेतरी कमी पडत असून,समाजसेवी प्रभाकर वाघमारे यांनी आरटीओंना अपघाताला ब्रेक लावण्या संदर्भात उपायोजना करण्यासाठी निवेदन दिले.शिवाय स्वंयम सुरक्षीतता बाळगावी असे आवाहन देखील केले आहे.
जिल्ह्यात अपघातांची संख्या बळवली आहे.आपघात टाळण्यासाठी शासनाने विविध नियम व अटी घालुन दिलेल्या आहेत.तरी अपघात वाढतच आहे.सरकारी नियमांचे पालन केले तर निश्चीत अपघात कमी होतील परंतू दुर्देवाने पाहिजे त्या प्रमाणात कायद्याची अंमलबजावणी होत नाही.काही वेळेस अधिकारी रस्त्यावर उतरून कार्यवाही करतात.परंतु वरिष्ठ अधिकारी यांना कार्यवाही टाळण्यासाठी राजकीय लोकांचा फोन गेल्याने अनेक वेळा कार्यवाही टाळल्या जाते. अपघात घडु नये यासाठी शासकिय,राजकिय, सामाजिक अश्या सर्वच स्थरातून उपाय योजना झाल्या तर निश्चित अपघाताची संख्या कमी होईल. या संदर्भात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री ज्ञानेश्वर हिरडे यांची भेट घेवून त्यांना निवेदन देण्यात आले आहे.
▪️सुरक्षेच्या दृष्टीतून हे करता येईल..!
अल्पवयीन बाईक बंदी अभियान,दारु पिऊन वाहन चालविण्यास बंदी,गाडी चालवित असतांना हेडफोन लाऊन तसेच चालु गाडीवर फोनवर बोलण्यास बंदी, रस्त्याने रनिंग करीत असतांना किंवा फिरण्यास जात असतांना हेडफोन लावुन चालू नये,अतिवेगा मध्ये वाहन चालविण्यास बंदी, वाहन चालवितांना शिरस्त्राण हे बधंनकारक करावे!