बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अनुकंपा भरती पारदर्शकपणे घेण्यात यावी,अर्ज प्रक्रियेतील दिव्यांग व अस्तिव्यांग तपासणी ही मुंबई मेडिकल मार्फत करण्यात यावी अन्यथा आमरण उपोषणाची भूमिका घ्यावी लागेल अशा इशाराचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शेख मुजाहिद शेख अहमद यांनी दिले आहे.
जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत 2024 मधील अनुकंपा धारक उमेदवारांची सुधारित अंतिम जेष्ठता यादी जिल्हा परिषदेच्या सांकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याकरिता 18 व 19 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेने उमेदवाराला कळविले आहे. कोविड काळात शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने त्यांना 50,00,000 रुपये देण्याचे शासनाने जाहीर केले होते. ही मदत घेतलेले जिल्हा परिषद विभागातील उमेदवारांची अनुकंपा तत्त्वावर त्याची दिव्यांग वस्ती व्यंग तपासणी कोणत्या प्रकारे केल्या जाईल? हे कळवावे शिवाय
अनुकंपा भरती पारदर्शकपणे घेण्यात यावी,अर्ज प्रक्रियेतील दिव्यांग व अस्तिव्यांग तपासणी ही मुंबई मेडिकल मार्फत करण्यात यावी अन्यथा आमरण उपोषण छेडावे लागेल अशा आशयाचे निवेदन
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शेख मुजाहिद शेख अहमद यांनी दिले आहे.