लोणार ( हॅलो बुलडाणा ) यासीन शेख – अल्पसंख्यांक समाजासाठी शैक्षणिक सामाजिक व आर्थिक विकासाच्या कामकाजात समानता आणण्यासाठी मौलाना आजाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिटयूट (मार्टी )या नावाने एक सवयत संस्था अल्पसंख्यांक समाजाला मुख्य प्रवाहत आणण्यासाठी स्थापन करावी यासाठी गेल्या 4 वर्षांपासून समाज प्रयत्न करत आहे मागील नागपूरला हिवाळी अधिवेशन मध्ये अल्पसंख्यांक मंत्री यांनी निर्णय 30 दिवसात घेण्याची घोषणा केलेली होती हज हाऊस औरंगाबाद च्या उदघाटन प्रसंगी अल्पसंख्यांक मंत्री यांनी शासन निर्णय तयार करणे सुरु असल्याचे देखिल अश्वस्त केले मात्र आता पर्यंत काही मोठी कारवाई होतांना दिसत नसल्याने व पुढील 27 जून पासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार असल्याने सदरहू मार्टी स्थापनेचा निर्णय घ्यावा व अल्पसंख्यांक समाजाला न्याय द्यावा या करिता महाराष्ट्र कृती समिती चे अध्यक्ष ऍड अझहर पठाण, विधी सल्लाहागार ऍड ड वसीम कुरेशी व सर्व पदाधिकारी यांनी सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये ठीक ठिकाणी विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य यांना निवेदन तर सादर केलेच आहे व मुख्यमंत्री यांना ही शासकीय कार्यालय मार्फत निवेदन पाठवले आहे आज लोणार तहसीलदार मार्फत मार्टी साठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदन सादर केला आहे.या वेळी मो. तौफिक कुरेशी,तौसिफ कुरेशी आकिब कुरेशी,वसीम पठान,मोसिन शाह,गफूर कुरेशी, शेख हुसैन,शेख साकिब रहेमन चौधरी,शेख रिहान शेख बदरोदिन चौधरी इत्यादी उपस्थिती होते.