spot_img
spot_img

💥EXCLUSIVE! एल.ए.क्यू लावताच अवैध धंदे बंद! – आमदार गायकवाड यांचे मोठे पाऊल! – बुलढाणा जिल्हा शांततामय ठेवणार,!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) काय ते अवैध धंदे..काय ते हप्तेखोरी अन् पोलिसांची नाममात्र कारवाई..! सगळं काही आलबेलच होतं बुलढाणा जिल्ह्यात! इतर लोकप्रतिनिधी सुद्धा झोपा काढत होते की काय? हा प्रश्न जनतेला देखील पडला होता.दरम्यान आता दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार संजय गायकवाड यांनी हे मुद्दे तारांकित प्रश्न म्हणून मांडले. लगेच पोलिसांची कारवाई देखील सुरू झाली आहे.परंतु आणखी एक प्रश्न रेंगाळत आहे,तो असा की, आतापर्यंत हे का सुरू होतं? याची चर्चा रंगत आहे.

आमदार गायकवाड यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नांमुळे खाकी वर्दींत हुडीहुडी भरली. जिल्ह्यामध्ये अनेक जातीय दंगली,गोमातेची तस्करी करून कत्तल,अवैध गुटखा, सर्रास अवैध धंदे, हेल्मेट सक्ती, अल्पवयीन मुली बेपत्ता, यासह विविध अनुचित प्रकार जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या दुर्लक्षामुळे होत असल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित करून खाकीला चांगलाच घाम फोडला. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात पोलिसांनी काल रात्रीपासूनच छोट्या-मोठ्या कारवाईला सुरुवात केली आहे. अवैध धंदे आजचे नाहीत ते पूर्वा पासून सुरू आहेत. असा सूर विरोधी पक्षनेत्यांनी आवळला होता.तेव्हा मात्र दखल घेतल्या गेली नाही. भाजपाचे आमदार जिल्ह्यामध्ये आहेत.त्यांनी कधी या संदर्भात ब्र शब्द काढला नाही.आता मात्र त्यांच्याच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी अतिक्रमण असो की अवैध धंदे बंद करण्याचा तारांकित प्रश्न मांडला आहे विकासाच्या मुद्द्याला मांडता येत असते आणि त्यांनी मांडले पाहिजे होते हे मुद्दे सोडून अवैध धंद्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला,असा आरोप आता त्यांच्यावर होत आहे. अटीतटीच्या विधान सभा निवडणूक स्पर्धेत निवडून आलेले आमदार संजय गायकवाड यांनीहे पाऊल उचलले असल्याचे त्यांचेच कार्यकर्ते आता चर्चा करत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!