बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भागवत भुसारी यांना गुप्त माहिती मिळाल्याने आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने मेहकर येथील एका गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या विरोधात कारवाई करून सोनोग्राफी सेंटरला सील लावले ही कारवाई अभिनंदनीय आहे मात्र एका शिक्षकाने आत्महत्या केलेल्या अवैध (?) व्यसनमुक्ती केंद्राला का बगल देण्यात आली हा प्रश्न नागरिक विचारत आहेत. दरम्यान अकोला आरोग्य उपसंचालकांकडून या संदर्भात एक पत्र आले असून ते देखील सध्या गुलदस्त्यात आहे.त्यामुळे आरोग्य विभागावरून लोकांचा विश्वास उडत चालल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भुसारी यांचे नातेवाईक असलेले डॉ. कुणाल शेवाळे सरकारी रुग्णालयातील रुग्ण आपल्या व्यसनमुक्ती केंद्रात हलवतात.मनमर्जी पैसे उकडतात, असा आरोप त्यांच्यावर अनेकदा झाला. त्यांच्या चिखली रोड वरील रिलिफ व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झालेल्या एका 47 वर्षीय शिक्षकांनी फाशी लावून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. सुनील काशिनाथ पाटील असे त्यांचे नाव आहे. व्यसनामुळे त्रस्त झाल्याने काही दिवसापूर्वी डॉ. कुणाल शेवाळे यांच्या चिखली रोड स्थित असलेले रिलीफ व्यसनमुक्ती केंद्रात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु त्यांनी आत्महत्या केली. डॉ.शेवाळे यांचे व्यसनमुक्ती केंद्र हे बेकायदा असल्याची बातमी ‘हॅलो बुलढाणा’ ने याआधी प्रसारीत केली आहे. या व्यसनमुक्ती केंद्राला अधिकृत परवाना नाही.येथे आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. महिन्यासाठी 30 हजार रुपये एका रुग्णाचे घेण्यात येतात. केवळ लूट सुरू असल्याच्या बातमीने आरोग्य विभाग खळबळून जागा झाला होता. दरम्यान आरोग्य उपसंचालकाकडून कारवाई संदर्भातील पत्र संबंधित यंत्रणेला प्राप्त झाले आहे. परंतु त्यांचे नातेवाईक असलेले जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भुसारी त्यांचा बचाव करीत असल्याचे आरोप होत आहेत.परंतु या जीव घेण्या व्यसनमुक्ती केंद्राच्या पारदर्शी तपासणीकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
(क्रमश:)