मेहकर (हॅलो बुलडाणा) विवेकानंद आश्रमाचे सहसचिव व ज्येष्ठ पत्रकार श्री विष्णुपंत कुलवंत यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. समाजासाठी कार्य करणारे, प्रत्येक भल्या माणसाला समर्थ साथ देणारे कुलवंत सर यांच्या निधनाची बातमी समजताच मेहकर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कुलवंत सर यांनी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून, समाजसेवेचा वसा अखेरपर्यंत जपला. त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कार उद्या दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता हिंदू स्मशानभूमी, जानेफळ रोड, मेहकर येथे होणार आहेत. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, मित्रमंडळी व असंख्य चाहत्यांचा मोठा परिवार आहे.
त्यांच्या निधनामुळे सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात अपरिमित नुकसान झाले आहे.