बुलढाणा (हॅलो बुलडाणा) स्थानिक जनता चौकातील कॅप्री ग्लोबल कॅपीटल लि.कंपनीच्या बुलढाणा शाखेत बनावट सोन्याचे दागिने,आभूषण तारण ठेवून कंपनीची फसवणूक करीत तब्बल 26,21,472 रुपयांचा घोळ केल्याची घटना घडली.या प्रकरणात शाखेतील कर्मचाऱ्यांनी आपल्याच ओळखीचे व नातेवाईकांचे सोन्याचे दागिने ठेवून त्यांची लोण केस केल्याचे समोर आले आहे.यात 3 ते 4 काही ग्राहक सुद्धा आहेत.
विशेष म्हणजे रिजनल मॅनेजर अरुण कुमार राठोड यांनी पोलिसात तक्रार दिल्याने शाखेतील सहा.शाखा प्रबंधक प्रविण गरकल, माजी एरिया मॅनेजर माधव लटपटे, दिपाली साळवे, आश्विनी नागरे, राजेंद्र मोरे, अक्षय बरडे, किशोर बिबे, निलेश सारवळकर यांच्यासह सर्व चेकर व मेकर यांच्या विरोधात पोलिसांनी भान्यासं (बीएनएस) नुसार 3(5),316(2)318(4) गुन्हा दाखल केला आहे. रिजनल मॅनेजर अरुण कुमार राठोड म्हणाले की,दिपाली साळवे,आश्विनी नागरे,किशोर बिबे यांना आधीच इंटीमेशन देण्यात आले होते परंतु त्यांनी ऐकले नाही.यांनी आपल्याच ओळखीच्या नातेवाईकांचे सोने तारण ठेवून लोण केस केली.विशेष म्हणजे सहा.शाखा प्रबंधक प्रविण गरकल यांचा काही दोष नसून त्यांच्या गैरहजर त्यांची आयडी वापरून त्यांच्या नावावर लोण केस करण्यात आली. शिवाय माजी एरिया मॅनेजर माधव लटपटे यांचाही या घोटाळ्यात रोल नसल्याची माहिती रिजनल मॅनेजर अरुण राठोड राहणार नांदेड यांनी सिटी न्यूजला मोबाईल कॉल व्दारे दिली आहे














