बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जन माणसांवर समाजसेवेची छाप पाडण्याच्या आशेने तरुण वयातच युगेशने कल्पना, योजनाच्या प्रयत्नांमध्ये स्वतःला झोकून दिले.कुठलीही समस्या असो,24 तासात समस्येच्या सोडवणूकीची कला त्यांनी अवगत केलीय.
हे व्यक्तिमत्व म्हणजे युगेश पंजाबराव जाधव असून ते केंद्रीय आयुष मंत्री तथा खा. प्रतापराव जाधव यांचे पुतणे आहेत.
युगेश म्हणतात की, “माझे जीवन हे सामाजिक कार्य बनले आहे. सामाजिक बदलाचा मार्ग लांब आणि कठीण असू शकतो, त्यासाठी संयम आणि चिकाटी आवश्यक आहे. बदलाच्या गतीने निराश होऊ नका, तुम्ही संपूर्ण प्रवास स्वीकारणे महत्त्वाचे आहे.” त्यांचा हा विचार युवा पिढीला प्रेरणादायी असा आहे.ना. प्रतापराव जाधव यांच्या तालमीत युगेश घडत आहेत.सामाजिक कार्यामध्ये विविध पार्श्वभूमी, संस्कृती आणि समुदायातील व्यक्तींसोबत काम करण्याची त्यांची धडपड वाखाणण्याजोगी आहे.परिवर्तन घडविण्याची ते आकांक्षा बाळगतात.त्याग, प्रामाणिकपणा, आत्मसन्मान, कल्पकता, चिकाटी या गुणांशी असलेली नाळ तुटली नाही पाहिजे, असे ते नेहमी सांगत असतात. गोरगरीब असो की श्रीमंत कोणीही फोन करून किंवा प्रत्यक्ष समस्या सांगितली तर 24 तासात त्यांच्या समस्यांचे निराकरण करणारे युगेश जाधव आता भावी पिढीला प्रेरक ठरत आहे, त्यांनी हा विश्वास पुढेही सार्थ ठरवावा, अशी त्यांच्या चाहत्या वर्गाकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.