बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा यंत्रणेला ‘झूकेगा नही साला’ म्हणत बुलढाणा जिल्ह्यात वाळू तस्कर पुष्पांनी उच्छाद मांडला. वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या पुष्पांची डेरिंग फार वाढलीय. कधीमधीच वाळू तस्करांवर कारवाई होते. आजही 4 ब्रास वाळूचे 2 टिप्पर बुलढाणा शहर पोलिसांनी पकडले.तहसील कार्यालयात जमा केले.तहसीलदार सुट्टीवर होते.परंतु मधात कुणीतरी ‘अर्थपूर्ण शाळा’ भरवल्याची चर्चा रंगत आहे.ही बातमी दाबण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून,सत्य उजागर करणार नाही ते ‘हॅलो बुलढाणा’ कसले?
आमच्या खात्रीलायक माहितीनुसार, (फोटो पहा) 2 वाळवणे भरलेले टिप्पर तहसिल कार्यालय परिसरात पकडून जमा करण्यात आले आहे.परंतु या टिप्पर मधील चार ब्रास भरलेली रेती पुढे एक किंवा दोन ब्रास दाखवण्यात येणार असल्याची शंका व्यक्त होत आहे.कारण तहसीलदार सुट्टीवर होते परंतु मधातील काहींनी या प्रकरणी हस्तक्षेप केला असून अर्थपूर्ण शाळा भरवल्याची चर्चा आहे.वाळू उत्खननातून अल्पावधीत अमाप पैसा मिळत असल्याने गावा गावातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात या व्यवसायात उतरला आहे. वाळू उपसा करण्यासाठी सर्व सरकारी नियम पायदळी तुडवून दिवसरात्र वाळूचा उपसा सुरू आहे.
शहरांचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे बांधकामासाठी वाळूची मागणी वाढली आहे. त्यासाठी लहान मोठ्या नद्यांच्या पात्रातून अमर्यादपणे वाळूचा उपसा होत आहे. पूर्वी गावातील छोट्या मोठ्या बांधकामांपर्यंत मर्यादीत असणारी वाळूची मागणी प्रचंड वाढली आहे. या व्यवसायात अत्याधुनिक यंत्रांनी शिरकाव केला आहे. जेसीबी, पोकलेन, यांत्रिक बोटी अशा यंत्रांच्या मदतीने नदीपात्रातील वाळू उपसून शहरांकडे पाठवली जात आहे. वाळू उपशास आळा घालण्यासाठी सरकारने कडक नियम केले आहेत.परंतु या नियमांची अंमलबजावणी होत नाही. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच वाळूचा उपसा करण्याचा नियम असला तरी रात्रीच्या वेळेसच वाळूचा उपसा होत आहे. नदीपात्रात वाहने उभी करुन त्यात वाळू भरून गुपचूपपणे गावाच्या बाहेर काढून दिली जातात. अवैधपणे होत असलेल्या या वाळू उपशाची माहिती गावातील महसूल विभागाचे अधिकारी, पोलिस यांना असते. माहिती असेल तर त्याकडे दुर्लक्ष का केले जाते ? पोलिस यंत्रणा काय करत असते? गावातून वाहने बाहेर कशी सोडली जातात?जिल्हा यंत्रणाही मुग गिळून का चूप असते? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यानंतर महसूल पथकाकडून कारवाई झालीच तर वाळूची वाहने ताब्यात घेणे, जिलेटीनच्या मदतीने स्फोट करुन वाळूचा उपसा करणारी बोट उडवणे, यंत्रसामग्री जप्त करणे अशी कारवाई होते. या जप्त केलेल्या वाहनांचा दंड संबंधितांनी भरल्यानंतर ही वाहने पुन्हा सोडून दिली जातात. या कारवाईनंतर तरी वाळू उपशास आळा बसेल असे अपेक्षित असले तरी तसे मात्र झालेले नाही. वाळूचा उपसा वाढतच आहे.वाळू व्यवसायात हप्तेखोरीचाही विषय दडलेला आहे. वाळूचे वाहन गावाबाहेर काढून देण्यासाठी गावातील गावपुढाऱ्यापासून सरकारी यंत्रणांपर्यंत किती जणांचे हात ओले करावे लागतात, याचे किस्से नेहमीच ऐकायला मिळतात.आज पोलिसांनी पकडून दिलेल्या वाळू टिप्पर प्रकरणी नियमाप्रमाणे कठोर कारवाई होते की नाही ? याकडे लक्ष लागून आहे.