बुलढाणा (हॅलो बुलडाणा) संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने स्थानिक क्रीडा संकुल रोडवरील निरंकारी सत्संग भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या कालावधीत हे शिबीर पार पडणार आहे.
आ. संजय गायकवाड यांच्याहस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे, निरंकारी मिशनचे छत्रपती संभाजीनगर क्षेत्रप्रमुख हरिष खूपचंदानी, जिल्हा संयोजक शालिग्राम चवरे यांसह आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहील. रक्तदान शिबिरानंतर सायंकाळी ५ ते ८ यावेळेत हरिष खूपचंदानी यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्संग सोहळा पार पडणार आहे. संत निरंकारी मिशन ही एक अध्यात्मिक विचारधारा आहे. मिशनच्या प्रमुख सुदिक्षा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जगभरात वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, जलस्वच्छ अभियान असे विविध उपक्रम राबविल्या जातात. यावर्षी देखील संत निरंकारी मिशन बुलढाणा शाखेच्यावतीने वार्षिक संत समागमानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी रक्तदान शिबीरात सहभागी व्हावे, तसेच सायंकाळी होणाऱ्या सत्संग सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बुलढाणा शाखेचे प्रमुख हनुमान भोसले, सेवादल संचालक सुभाष राजपूत यांनी केले आहे.