मेहकर (हॅलो बुलडाणा) ‘डेव्हलपमेंट!’या शब्दासाठी त्रस्त झालेल्या मतदारांनी सिद्धार्थ खरात यांच्यावर विश्वास दाखवून विधानसभा निवडणुकीत त्यांना जिंकून दिले.मतदारांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी खरातांनी देखील निवडून येताच पावले पुढे टाकली आहे.त्यांनी मेहकर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन विकास कामाची 6 डिसेंबरला ग्वाही दिली आहे.
मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ रामभाऊ खरात यांनी 6 डिसेंबर रोजी सकाळीच दहा वाजता महापरिनिर्वाण दिनानिमित्त अशोका वाटिका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले व लगेच उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठक घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली व त्यांना घेऊन छ.शिवाजी महाराज स्मारकाच्या कामाची पाहणी केली. अत्यंत धिम्या गतीने हे काम चालू आहे त्याला गती देऊन स्मारक समिती नेमून लोकवर्गणीतून 19 फेब्रुवारी पर्यंत पुतळा बसवण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही आमदार खरात यावेळी म्हणाले, तसेच मेहकर बसस्थानक इमारतीच्या कामांची पाहणी केली असता हे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जेचे दिसून आले, तसेच बस स्थानकावर महिलांसाठी व पुरुषांसाठी प्रसाधन गृह नाही, मुतारीचे व गटारीचे पाणी जमा होऊन डोह साचलेले आहेत,रात्री बे रात्री प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची कुचंबणा होते, बसस्थानक मध्ये लाईट ची व्यवस्था नाही त्यामुळे लगेच कंत्राटदाराला व बस स्थानक अधिकाऱ्यांना फोन करून तीन महिन्याच्या आत नवीन बसस्थानक सुरु करण्याचा अल्टिमेट दिला आहे.सध्या सुरू असलेल्या बसस्थानकामध्ये मुरूम टाकून महिलांना व पुरुषांना मोबाईल प्रसाधन गृह उद्याच्या उद्या सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आणि जर नविन बसस्थानक तीन महिन्यात सुरु केले नाही तर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात येईल दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा गंभिर इशारा देण्यात आला आहे. मेहकर एमआयडीसी च्या जमिनीची पाहणी केली असता तेथे फक्त एक ते दोन उद्योग सुरु आहेत त्यांना विज पुरवठा दिला नाही, पाणी, रस्ते नाही, नविन उद्योजक येऊ दिले नाही आणले नाही,उद्योजकांना प्रोत्साहन दिले नाही त्यांना कोणत्याच शासकीय सवलती देण्यात आल्या नाही,जेथे उद्योग उभारणी करायची होती तिथे मात्र अतिक्रमण झालेले आहे, येथे फक्त 53 एकर जमीन 1989 मध्ये राखीव करण्यात आली आणि वाढीव जमिनीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय येथे धूळ खात पडून आहेत त्या मुळे प्रथम प्राधान्याने येथे औद्योगिक वसाहतीसाठी 500 एकर जमीन उपलध करून देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल येथे कृषि प्रक्रिया उद्योग,आणुन रोजगार निर्मिती करण्यात येईल, असे आश्वासन आमदार सिद्धार्थ खरात यांनी यावेळी दिले. एकंदरीतच शेतकरी व सामान्य जनतेच्या हाताला काम व नागरिकांना किमान सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असेही आमदार खरात यांनी आश्वासन दिले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष आशिषभाऊ रहाटे निंबाभाऊ पांडव ,तालुका अध्यक्ष मेहकर, काँग्रेस नेते ॲड. अनंत वानखेडे मेहकर शहर अध्यक्ष किशोर गारोळे,युवा सेना तालुका प्रमुख ॲड आकाश घोडे, ॲड संदीप गवई , साहेबराव हिवाळे,भास्कर गारोळे, शैलेश बावस्कर, सुरेश सरकटे, संदिप गारोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.