spot_img
spot_img

💥अभिवादन! महापरिनिर्वाण दिनी रक्तदान ! – तब्बल तीनशे पिशव्या होणार रक्तसंकलन! -बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात महामानवाची पुण्यतिथी!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बाबासाहेबांचा 68 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त बुलढाण्यात ठीक ठिकाणी अभिवादन केले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आणि महामानव ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात येत असून तब्बल 300 पिशव्या रक्त संकलन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 68 वी पुण्यतिथी साजरी केली जात आहे. समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव आंबेडकर यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी अखेरचा श्वास घेतला होता. हाच दिवस भारतात महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे नागरिक करत आहे.गेल्या 13 वर्षापासून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव ग्रुपच्या वतीने रक्तदान करून अभिवादन केल्या जाते. आजही जवळपास 300 रक्त बॅग देऊन अभिवादन केले जाणार आहे. डॉ बाबासाहेब सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने देखील यावर्षी रक्ताचे महत्त्व समजून घेत रक्तदान शिबिर आयोजित केले गेले आहे. बुलढाणा शहरात अभिवादन करण्यासाठी बुलढाणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड, शिवसेना उबाटा गटाचे नेते दत्तात्रय लहाने, काँग्रेसचे दत्ता काकस,युवानेते सोनू जाधव सह अन्य क्षेत्रातील नागरिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल कासारे,महामानव ग्रुपचे अध्यक्ष
सुमित गायकवाड व इतरही नागरिकांची उपस्थिती होती.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!