बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतल्यानंतर आज बुलढाणा शहरात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चौका चौकात फटाके फोडून आतिषबाजी करत सर्वांना मिठाई देऊन जल्लोष साजरा केला.
मुख्यमंत्रीपदी सहाव्यांदा विराजमान झाल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांचे
राज्यभर स्वागत आणि अभिनंदन होत आहे.
देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित दादा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर सर्वप्रथम माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला त्यानंतर भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या निनादात संगम चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मानवंदना करून जल्लोष साजरा केला या ठिकाणी सुद्धा कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी केली. सोबत महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे व लाडू देऊन तोंड गोड करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाचा जयघोष करत आनंद साजरा केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव चंद्रकांत बर्दे, कामगार मोर्चाचे दीपक वारे, डाॅक्टर सेल चे जिल्हाध्यक्ष राजेश उबरहंडे, किसान मोर्चाचे प्रमुख विश्राम पवार, कामगार मोर्चाचे प्रमुख अण्णा पवार, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ सिंधुबाई खेडेकर, सौ. अलका पाठक, सौ उषाताई पवार, सौ. शोभा ढवळे, माजी शहराध्यक्ष अनंत शिंदे, राजेंद्र पवार, राजेंद्र खरात, अशोक किन्होळकर, महादेव, शिराळ, सचिन शेळके, राजू सुरपाटणे, अशोक बाहेकर, कुलदीप पवार, अखिल हाजी, रिजवान खान, सलमान खान, प्रशांत बोरसे, किरण नाईक, सागर पाटील, संदीप वानरे, सतीश देहाडराय, दशर सिंग राजपूत यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.