बुलडाणा (हॅलो बुलडाणा) पत्रकारांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करते. नुकतीच विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांसाठी अनोखी स्पर्धा व्हाईस ऑफ मीडिया आणि बुलडाणा अर्बन चे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात अचूक अंदाज वर्तवणाऱ्या पत्रकारांना लाखोंची बक्षीस या स्पर्धेत ठरवण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून बुधवार दिनांक ४/१२/२०२४ रोजी पत्रकार भवनात सकाळी १०.३० वाजता बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यात घाटाखाली तीन व घाटावर चार अशा सात विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण निवडून येणार याचे अचूक अंदाज पत्रकारांच्या माध्यमातून घेण्यासाठी “अंदाज स्पर्धा २०२४ ” घेण्यात आली. यात पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या पत्रकारांच्या अहवालांची तटस्थ यंत्रणेकडन तपासणी करण्यात आली. त्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी कुणीही ठरला नाही हे विशेष! मात्र द्वितीय बक्षिसाचे दोन मानकरी आणि तृतीय क्रमांकाचे १८ मानकरी ठरले आहेत. या सर्वांना बक्षीसाची रक्कम ही विभागून देण्यात येणार आहे. या बक्षीस वितरणाच्या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक उपाख्य भाईजी, व्हाईस ऑफ मिडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, दैनिक देशोन्नती चे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे, व्हॉइस ऑफ मीडिया राज्य कोअर कमिटी सदस्य अरुण जैन, विदर्भ संघटक सिद्धार्थ आराख, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा सपकाळ, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्डे, गुड इव्हिनिंग सिटी चे संपादक रणजीतसिंग राजपूत, यांची प्रमुख उपस्थिती यावेळी राहणार आहे.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे..
स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे ५१०००/- बक्षीस संजय शिराळ बुलडाणा व योगेश शर्मा चिखली यांना मिळाले आहे. त्यांना ते विभागून देण्यात येईल. तर तिसरा क्रमांकाचे बक्षीस तब्बल १८ पत्रकारांनी पटकावले आहे. यामध्ये संजय सोळंके रायपूर, अनिल गवई खामगाव, हरिदास गायकवाड बुलढाणा, मनोज पाटील मलकापूर, शिवदास जाधव चिखली, गोपाल तुपकर चिखली, संदीप वानखेडे बुलढाणा, पप्पू राठी मोताळा, शेख अलीम खामगाव, नितीन शिरसाट बुलढाणा, छोटू कांबळे चिखली, शेख आसिफ बुलढाणा, शेख अहमद शेख कुरेशी साखरखेर्डा, अशोक रावणकर, मलकापूर मंगेश कंकाळ, संदीप सावजी मलकापूर, गजानन भालेकर देऊळगाव मही, व दिलीप चहाकर मोताळा यांना मिळाले आहे. असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संदीप वंत्रोले यांनी कळविले आहे.