बुलढाणा (हॅलो बुलडाणा) उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत तळ गाठतात. परंतू वनराई बंधारे बांधल्यास शेतकर्यांसह पशु-पक्ष्यांसाठी वरदान ठरतात. परिणामी बुलढाणा जिल्ह्यात सन 2024-2025 या वर्षात पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आता पर्यंत तालुका निहाय 510 वनराई बंधारे श्रमदानातुन बांधण्यात आलेत.
श्रमदानातुन वनराई बांधण्यात आल्यामुळे आता पुढील दिवस जनावरांची तहान भागवण्यास मदत होणार आहे. जलसंधारणाच्या स्थायी उपचारा सोबतच अत्यंत अल्प खर्च असणारा पर्याय म्हणजे वनराई बंधारे बांधणे आहे. पावसाळा संपण्याच्या वेळी पावसाची तीव्रता व नदी नाल्यातील पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी होत असल्यामुळे कमी उताराच्या जागी वाळु,माती आणि सिंमेटच्या रिकाम्या गोण्या भरुन वनराई बंधारे बांधणे गरजेचे आहे.
वनराई बंधाऱ्यामुळे वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी होत असल्याने जमिनीतील भुजल पातळी वाढते. त्यामुळे आजुबाजुंच्या विहिरींच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होते. या उपक्रमामुळे पाणी जमिनीमध्ये मुरण्यास मदत होते. त्यामुळे जास्तीत जास्त वनराई बंधारे श्रमदानातुन बांधणेकरिता सहकार्य करावे असे आवाहन कृषीविभागाकडून करण्यात येत आहे.
▪️तालुका
वनराई बंधारे संख्येवर दृष्टीक्षेप!
बुलडाणा49,चिखली 109,मोताळा
29, मलकापुर 28, खामगाव 60,
शेगाव 31,नांदुरा
25,जळगाव जामोद 24, संग्रामपुर
27,मेहकर
26, लोणार
32, देऊळगाव राजा 32,सिंदखेड राजा 38 असे एकुण 510 बंधाऱ्यांची संख्या आहे.