बुलढाणा (हॅलो बुलडाणा) नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांनी आतापासूनच विकास कामासाठी पायाला भिंगरी बांधली असून त्यांनी थेट पेनटाकळी कालव्यात उतरून पाहणी करीत संबंधित यंत्रणेला धारेवर धरत सूचना केल्या.
शेती सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या पेनटाकळी प्रकल्पावरील कालव्यांमधून पाझरणाऱ्या पाण्याची समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून
2 डिसेंबर रोजी आमदार सिद्धार्थ खरात यांनी जानेफळनजीक मोसंबेबाडी येथे
कालव्यात उतरून पाहणी केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी कालव्याची दुरुस्ती प्राधान्यक्रमाने करून ‘टेल टू हेड’ पाणी कसे देता यईल, यास
प्राधान्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. कालव्याच्या झिरपणाऱ्या पाण्याने जमिनी चीभडत असल्याने या दुरावस्थेबाबत अधिकाऱ्यांना खडसावले. दरम्यान पेनटाकळी प्रकल्पावरील कालव्यातून पाझरणाऱ्या पाण्याच्या संदर्भाने आ. सिद्धार्थ खरात यांनी अधिकाऱ्यांची नंतर बैठक घेत उपाययोजना
करण्याच्या सूचना दिल्या.