चिखली (हॅलो बुलडाणा) चिखली तहसील कार्यालयाचे विद्यमान तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी संतोष काकडे रजेवर असल्यामुळे, प्रभारी तहसीलदार पदाचा पदभार नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. महसूल विभागाकडून या संदर्भात अधिकृत आदेश जारी करण्यात आले असून, गायकवाड यांच्याकडे महसूल विभाग दोनचे नायब तहसीलदार पद देखील कायम राहणार आहे.
मुरलीधर गायकवाड हे प्रशासनिक कामकाजात अनुभवी असून, त्यांच्याकडे तहसीलदार पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी तहसील कार्यालयाच्या विविध कार्यवाहींवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. प्रभारी तहसीलदार म्हणून गायकवाड यांच्याकडून चिखली तालुक्यातील महसूल व दंडाधिकारी कामकाज सुरळीत पार पाडले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
तहसीलदार काकडेच्या रजेच्या काळात, तालुक्यातील सर्व महसूल आणि प्रशासकीय कामे योग्य रीतीने पार पाडण्यासाठी गायकवाड यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.